नाचतो डोंबारी रं
ढमाढम ढोल रं झमाझम झांझरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
उद्याच्या पोटाची काळजी कशाला
आभाळ पांघरु दगड उशाला
गाळुनी घाम असा मागूया भाकरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
सोळातली नार मी, रंग माझा बैंगणी
उर होई खालीवर, सूरत माझी ठेंगणी
जवानीनं तोडली रं रानफूलं डोंगरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
विसावं वरीस आलंया भराला
भिंगाची चोळी ग दाटते उराला
सोन्याचा माड असा शंभर नंभरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
हातामधी घेतली आडवी चिवाटी
तारेवरी डोलता नाचतो कोल्हाटी
माणसं झाली का रं कावरीबावरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
कोल्हाटी अंगाची वाकली कमान
कोलांटी मारतो गिरक्या घेऊन
करती कौतुक शेजारीपाजारी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
काठी भली लांबडी दातांनी धरितो
वार्यावर घुमुनी रिंगण घालितो
चढुनी उतरितो पायरी पायरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
जात अशी रांगडी, भोळी तशी भाबडी
भल्यासंगं भली रं, बुर्यासंगं वाकडी
पायाला आमुच्या रं बांधली भिंगरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
उद्याच्या पोटाची काळजी कशाला
आभाळ पांघरु दगड उशाला
गाळुनी घाम असा मागूया भाकरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
सोळातली नार मी, रंग माझा बैंगणी
उर होई खालीवर, सूरत माझी ठेंगणी
जवानीनं तोडली रं रानफूलं डोंगरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
विसावं वरीस आलंया भराला
भिंगाची चोळी ग दाटते उराला
सोन्याचा माड असा शंभर नंभरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
हातामधी घेतली आडवी चिवाटी
तारेवरी डोलता नाचतो कोल्हाटी
माणसं झाली का रं कावरीबावरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
कोल्हाटी अंगाची वाकली कमान
कोलांटी मारतो गिरक्या घेऊन
करती कौतुक शेजारीपाजारी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
काठी भली लांबडी दातांनी धरितो
वार्यावर घुमुनी रिंगण घालितो
चढुनी उतरितो पायरी पायरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
जात अशी रांगडी, भोळी तशी भाबडी
भल्यासंगं भली रं, बुर्यासंगं वाकडी
पायाला आमुच्या रं बांधली भिंगरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | कृष्णा कल्ले, बालकराम, सुलोचना चव्हाण |
चित्रपट | - | केला इशारा जाता जाता |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कोल्हाटी | - | डोंबारी. |
चिवाटी | - | बांबूची काठी. |
झांझरी | - | लहान झांज. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.