देव जरी मज कधी भेटला
देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभु रे माझे सारे
जीवन देई मम बाळाला
कृष्णा गोदा स्नान घालु दे
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी
मुक्ताई निजवु दे तुजला
शिवरायाच्या मागिन शौर्या
कर्णाच्या घेईन औदार्या
ध्रुव-चिलयाच्या अभंग प्रेमा
लाभु दे चिमण्या राजाला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभु रे माझे सारे
जीवन देई मम बाळाला
कृष्णा गोदा स्नान घालु दे
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी
मुक्ताई निजवु दे तुजला
शिवरायाच्या मागिन शौर्या
कर्णाच्या घेईन औदार्या
ध्रुव-चिलयाच्या अभंग प्रेमा
लाभु दे चिमण्या राजाला
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | मोलकरीण |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
चिलया | - | श्रीयाळराजा व चांगुणाराणीचा पुत्र. यांची परिक्षा पाहण्यासाठी भगवान शंकराने चिलयाचे मांस मागितले. नंतर भगवान शंकराने यांस परत जिवंत केले. |
ध्रुव | - | उत्तानपादराजाचा मुलगा. याचा लहानपणी अपमान व निर्भत्सना केला गेल्याने रागावून याने वनात मोठे तप केले व ध्रुव (अढळ)पद मिळविले. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.