दे साद दे हृदया
दे साद दे हृदया
जन्मांतरीचा ध्यास हो हृदया
तृष्णेचा घट हा, धन हे माझे
जळ हे भवती गमले ओझे
पैलतिरीचा मेघ हो हृदया
जन्मांचा पथ हा, जुळले धागे
छायेपरी ही नियती येई मागे
त्या संचिताचा सूर हो हृदया
जागली क्षणघनमाला
जन्मच अवघा बरसून आला
त्या चेतनेचा श्वास हो हृदया
जन्मांतरीचा ध्यास हो हृदया
तृष्णेचा घट हा, धन हे माझे
जळ हे भवती गमले ओझे
पैलतिरीचा मेघ हो हृदया
जन्मांचा पथ हा, जुळले धागे
छायेपरी ही नियती येई मागे
त्या संचिताचा सूर हो हृदया
जागली क्षणघनमाला
जन्मच अवघा बरसून आला
त्या चेतनेचा श्वास हो हृदया
गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | आरती अंकलीकर-टिकेकर, सुरेश वाडकर |
राग | - | बिलासखानी तोडी |
ताल | - | झपताल |
गीत प्रकार | - | भावगीत |
संचित | - | पूर्वजन्मीचे पापपुण्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.