समतेचे घ्या निशाण हाती
समतेचे घ्या निशाण हाती, गीत गात जा विश्वाचे
मान मानवा जात मानवी, मंदिर मानवधर्माचे
उदंड प्राणी वनस्पतीही जीवन त्यांना सूर्याचे
काळ्या-गोर्या देही फिरते लाल रक्त हे हृदयाचे
बंधुभाव स्वातंत्र्य नि समता हे शील भारतवर्षाचे
समताधिष्ठित समाज रचना दिव्य ध्येय हे जगताचे
पहाट जैसी ज्याची संध्या अस्तोदय त्या धरतीचे
जन्मा घाली नारी नर वा भेद वर्ण ना कायेचे
समाजतरू हा शुष्क जाहला विषमता विषवल्लीने
तांब-तृणाला कापून टाका संजीवन द्या समतेचे
भरतभूमीच्या सुपुत्रांनी शंख फुंकिले समतेचे
महात्म्यांना वंदन ज्यांनी चंदन केले देहाचे

गीत | - | जयराम चव्हाण |
संगीत | - | कनू घोष |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
तांब | - | पिकावरचा रोग. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.