दर्यावरी रं तरली होरी रं
दर्यावरी रं तरली होरी रं
तुझीमाझी जोरी बरी
साजणा, होरीतून जाऊ घरी
पान्यावानी पिरत तुझी
झाला माझा जीव राजी
धावलं मन येड्यापरी
मायेच्या रं घराच्या या वाटंवरी
साजणी, आता नको जाऊ दुरी
मासोलीचं डोलं तुझं
जाल्यावानी मन माझं
घावलं, परडी भरली
गोमुच्या ग पिरतीच्या या मासोलीनं
साजणा, जाऊ नको दुरी
शिडातुनी आयला वारा
होरीला गो नाही थारा
नाखवा घोर नको काळजाला
कोलीवाडा अंगाशी रं आता आयला
साजणी, होरीतुनी जाऊ घरी
तुझीमाझी जोरी बरी
साजणा, होरीतून जाऊ घरी
पान्यावानी पिरत तुझी
झाला माझा जीव राजी
धावलं मन येड्यापरी
मायेच्या रं घराच्या या वाटंवरी
साजणी, आता नको जाऊ दुरी
मासोलीचं डोलं तुझं
जाल्यावानी मन माझं
घावलं, परडी भरली
गोमुच्या ग पिरतीच्या या मासोलीनं
साजणा, जाऊ नको दुरी
शिडातुनी आयला वारा
होरीला गो नाही थारा
नाखवा घोर नको काळजाला
कोलीवाडा अंगाशी रं आता आयला
साजणी, होरीतुनी जाऊ घरी
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | प्रदीप-विलास |
स्वर | - | श्यामा चित्तार, हेमंतकुमार |
गीत प्रकार | - | कोळीगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.