A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी

महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी
मुशाफिरा चल माझ्यासाठी

अपूर्व सुंदर मूर्त होउनी
जिथे नांदते शौर्य मराठी
हरहर गर्जत जरिपटक्याची
जिथे नाचली भगवी काठी

रक्त ठिबकल्या समशेरीचा
टिळा शोभतो जिच्या ललाटी
जिने उधळली शिवचरणावर
जलपुष्पे ती अनंतकोटी

नीत्य राहती दत्तदिगंबर
जिच्या तटावर भक्तीसाठी
जिला लागली समर्थ गुरुनी
चैतन्याची शिकवण मोठी

शीळ घालते नरसिंहांना
जिथे लावणी सुस्वरकंठी
थाप डफावर ऐकून प्रेते
उठली येथे क्रांतीसाठी
गीत - पी. सावळाराम
संगीत -
स्वर-
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
पटका - फेटा / निशाण / ध्वज / ( जरीपटका - मराठ्यांचे निशाण ).
ललाट - कपाळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.