दादाचं घर बाई उन्हात
तुझी नि माझी जंमत वहिनी ऐक सांगते कानात
आपण दोघी बांधूया ग दादाचं घर बाई उन्हात
उगाच करतो खोडी ग, मलाच म्हणतो वेडी ग
तुला चिडवितो, मला रडवितो आणिक हसतो गालात
खेळ मला ग आणी ना, साडी तुजला देईना
ऐट दाखवी वरती आणिक सदा तो अपुल्या तोर्यात
वहिनी का ग हिरमुसली? नकोच का शिक्षा असली?
फितूर होशिल दादाला ही शंका येते मनात

गीत | - | जयंत मराठे |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | बालगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.