A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वाजे विजय तुतारी रे

वाजे विजय तुतारी रे, तोरण बांधा दारी रे
रजत जयंती स्वातंत्र्याची दुमदुमते ललकारी रे
चला रे घुमवा जयजयकार, जय जय भारतमाता

खडतर होती पहिली वाट
आता सरले अवघड घाट
या विजयाच्या शिखरावरती झेंडा उंच उभारी रे

भूमीमध्ये जिरला घाम
कामकर्‍यांचे फळले काम
हिरवी राने हिरवी पाने, हिरवी भूमी सारी रे

हिंमत हरली दैन्याची
फत्ते झाली सैन्याची
भारतमाता आहे आता भाग्याची अधिकारी रे

नवतरुणांनो सरसावा
जपा जपा रे हा ठेवा
नव्या नव्या नित आकाशांतुन मारा गरुडभरारी रे