डाव टाका नजर माझी जिंका
गंजिफा नार खेळते, डाव तुम्ही टाका
डाव टाका, नजर माझी जिंका
मदनाचा रंग दरबारी, या सवती ढाल तलवारी
चला फेका, दूर सरका, पिरतीला रोखा
डाव टाका, नजर माझी जिंका
रूपाचा गुलाबी प्याला, काठोकाठ बघा भरलेला
नका लावू हात अंगा, दुरूनी झोका
डाव टाका, नजर माझी जिंका
थयथयते रंगढंगात कस्तुरी धुंद अंगात
ओढुनी शिरी तांबडी चिरी, पळाला धोका
डाव टाका, नजर माझी जिंका
डाव टाका, नजर माझी जिंका
मदनाचा रंग दरबारी, या सवती ढाल तलवारी
चला फेका, दूर सरका, पिरतीला रोखा
डाव टाका, नजर माझी जिंका
रूपाचा गुलाबी प्याला, काठोकाठ बघा भरलेला
नका लावू हात अंगा, दुरूनी झोका
डाव टाका, नजर माझी जिंका
थयथयते रंगढंगात कस्तुरी धुंद अंगात
ओढुनी शिरी तांबडी चिरी, पळाला धोका
डाव टाका, नजर माझी जिंका
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | पावनखिंड |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी, नयनांच्या कोंदणी |
कस्तुरी | - | एक अतिशय सुगंधी द्रव्य. |
गंजिफा | - | पत्त्यांचा एक प्रकारचा खेळ. |
चिरी | - | बारीक रेघ / कुंकू. |
झोकणे | - | घटाघट पिणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.