दान देवूनी सर्वस्वाचे
दान देवूनी सर्वस्वाचे, कुबेर मी अंतरी
प्रीतिची रीतच ही न्यारी
मम हाताचा करीन कणा मी
जशी कैकयी रणसंग्रामी
दो हातांनी कष्ट उपसता, गोडी संसारी
वनात जैसी सीतामाई
रामरूप ती होउन राही
पतीसंगती पुष्पताटवे कुंपण काटेरी
मनी जागवीन सावित्रीला
परतुन लावीन यमदूताला
पतीप्रेमाहुन दुजे न मोठे भरल्या संसारी
प्रीतिची रीतच ही न्यारी
मम हाताचा करीन कणा मी
जशी कैकयी रणसंग्रामी
दो हातांनी कष्ट उपसता, गोडी संसारी
वनात जैसी सीतामाई
रामरूप ती होउन राही
पतीसंगती पुष्पताटवे कुंपण काटेरी
मनी जागवीन सावित्रीला
परतुन लावीन यमदूताला
पतीप्रेमाहुन दुजे न मोठे भरल्या संसारी
गीत | - | रामचंद्र हिंगणे |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | वाट चुकलेले नवरे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कुबेर | - | देवांचा खजिनदार / श्रीमंत व्यक्ती. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.