चोच जयाने दिधली बाळा
चोच जयाने दिधली बाळा
घास द्याया विसरलेला
कळुनी येता चूक आपुली
देव नाही जेवलेला
अनंत कोटी जीव जिवांचा
पोशिंदा तो प्रभू एकला
सर्वामुखी तो घास भरविता
असेल शिणला चालुन थकला
भूक आमची मिठी मारता
गहिवरुनी तो व्याकुळलेला
अश्रु ढाळित येता धावत
सीमेवरती दिन मावळला
चंद्रमौळी घर हे आपुले
अंधारातच शोधित आला
मिटल्या नयनी येईल स्वप्नी
घास आपणा भरवायाला
घास द्याया विसरलेला
कळुनी येता चूक आपुली
देव नाही जेवलेला
अनंत कोटी जीव जिवांचा
पोशिंदा तो प्रभू एकला
सर्वामुखी तो घास भरविता
असेल शिणला चालुन थकला
भूक आमची मिठी मारता
गहिवरुनी तो व्याकुळलेला
अश्रु ढाळित येता धावत
सीमेवरती दिन मावळला
चंद्रमौळी घर हे आपुले
अंधारातच शोधित आला
मिटल्या नयनी येईल स्वप्नी
घास आपणा भरवायाला
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | धर्मकन्या |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
चंद्रमौळी | - | मोडके तोडके घर / अतिशय दारिद्र्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.