दिलवरा दिल माझे ओळखा
राम राम घ्या, दूर करा जी भवतीचा घोळका
दिलवरा, दिल माझे ओळखा !
बांधला बादली साफा जरी मी वरून
रुळतात केस हे कुरळे भाळावरून
बघताच तुम्हाला डोळे आले भरून
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !
ही पैरण मेली चोळीहुन काचली
हलचाल कटीची शेल्याने जाचली
पाऊले महाली कशीबशी पोचली
सोंग घेतल्या कधी चांदणे बनेल हो जाळ का?
दिलवरा दिल माझे ओळखा !
तुजसाठी दौड मी केली घोड्यावरून
मर्दानी वेष हा दुनियेसाठी करून
चोरून निघाले रात्री माझ्या घरून
एकान्ती मज घेई जवळी, सख्या असा वेळ का?
दिलवरा दिल माझे ओळखा !
दिलवरा, दिल माझे ओळखा !
बांधला बादली साफा जरी मी वरून
रुळतात केस हे कुरळे भाळावरून
बघताच तुम्हाला डोळे आले भरून
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !
ही पैरण मेली चोळीहुन काचली
हलचाल कटीची शेल्याने जाचली
पाऊले महाली कशीबशी पोचली
सोंग घेतल्या कधी चांदणे बनेल हो जाळ का?
दिलवरा दिल माझे ओळखा !
तुजसाठी दौड मी केली घोड्यावरून
मर्दानी वेष हा दुनियेसाठी करून
चोरून निघाले रात्री माझ्या घरून
एकान्ती मज घेई जवळी, सख्या असा वेळ का?
दिलवरा दिल माझे ओळखा !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | सांगत्ये ऐका |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
कटि | - | कंबर. |
दिलवर | - | शूर / धाडसी. |
साफा | - | फेटा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.