चिंब भिजलेले रूप सजलेले
या रिमझिम झिलमिल पाऊसधारा, तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा, गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे
ओढ जागे राजसा रे, अंतरी सुख बोले
सप्तरंगी पाखरू हे, इंद्रधनू बघ आले
लाट ही वादळी मोहुनी गाते
ही मिठी लाडकी भोवरा होते
पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे बेधुंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे
हे फूल आले पंख आले, रूप हे सुखाचे
रोमरोमी जागले दीप बघ स्वप्नांचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भर्जरी वेड हे ताल-छंदांचे
घन व्याकूळ रिमझिमणारा
मन-अंतर दरवळणारा
ही स्वर्गसुखाची दारे, हे गीत प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे
सहवास तुझा मधुमास फुलांचा, गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे
ओढ जागे राजसा रे, अंतरी सुख बोले
सप्तरंगी पाखरू हे, इंद्रधनू बघ आले
लाट ही वादळी मोहुनी गाते
ही मिठी लाडकी भोवरा होते
पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे बेधुंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे
हे फूल आले पंख आले, रूप हे सुखाचे
रोमरोमी जागले दीप बघ स्वप्नांचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भर्जरी वेड हे ताल-छंदांचे
घन व्याकूळ रिमझिमणारा
मन-अंतर दरवळणारा
ही स्वर्गसुखाची दारे, हे गीत प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे
गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | अजय-अतुल |
स्वर | - | शंकर महादेवन, प्रीती कामत-तेलंग |
चित्रपट | - | बंध प्रेमाचे |
गीत प्रकार | - | चित्रगीत, ऋतू बरवा, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.