चंद्र वाटेवरी एकटा चालतो
चंद्र वाटेवरी एकटा चालतो
चालताना खुणावून का हासतो?
त्या कळावी कशी दो जिवांची कथा?
जाणली का तयाने मनीची व्यथा?
चंदनी स्पर्श अंगावरी शिंपतो
चालताना खुणावून का हासतो?
संथ लाटांवरी बिंब हेलावते
ओळखीचे तुझे रूप साकारते
चोरट्या कौतुकाने मला छेडितो
चालताना खुणावून का हासतो?
पानजाळीत का थांबले चांदणे?
जाणवे अंतरी गूढ ते सांगणे
स्वप्नभेटीस दोघांस बोलावितो
चालताना खुणावून का हासतो?
चालताना खुणावून का हासतो?
त्या कळावी कशी दो जिवांची कथा?
जाणली का तयाने मनीची व्यथा?
चंदनी स्पर्श अंगावरी शिंपतो
चालताना खुणावून का हासतो?
संथ लाटांवरी बिंब हेलावते
ओळखीचे तुझे रूप साकारते
चोरट्या कौतुकाने मला छेडितो
चालताना खुणावून का हासतो?
पानजाळीत का थांबले चांदणे?
जाणवे अंतरी गूढ ते सांगणे
स्वप्नभेटीस दोघांस बोलावितो
चालताना खुणावून का हासतो?
गीत | - | गोपाळ मयेकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत, शब्दशारदेचे चांदणे |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.