A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
साध्य नसे मुनिकन्या

साध्य नसे मुनिकन्या । मज ही ।
परि वेडें मन ऐकत नाहीं ॥

पाहुनि सखिच्या विविध विलासा ।
मन घेई हें बहु विश्वासा ।
स्मर जरि तुष्ट न होई ।
मी परि बहु सुख यांतचि घेई ॥

(राग काफी, ताल व चाल सदर)
डोळे मुरडुनि सहज बघे ती ।
ठुमकत मुरडत चाले गजगति ।
चेष्टा केली सखीसी ।
तें मी मजकडे लावुनि घेई ॥
Random song suggestion