चांदण्यात चालू दे
चांदण्यात चालू दे मंद नाव नाविका
तरंगती जळावरी संथ चंद्र-चंद्रिका
तूच साथ दे मला
तूच हात दे मला
तूच ने तुझ्यासवे मंत्रमुग्ध बालिका
भाव जे असावले
तुझ्यात ते विसावले
नकोस होऊ रे कधी संगतीस पारखा
तरंगती जळावरी संथ चंद्र-चंद्रिका
तूच साथ दे मला
तूच हात दे मला
तूच ने तुझ्यासवे मंत्रमुग्ध बालिका
भाव जे असावले
तुझ्यात ते विसावले
नकोस होऊ रे कधी संगतीस पारखा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | ललिता फडके |
चित्रपट | - | मायाबाजार (ऊर्फ वत्सलाहरण) |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, चित्रगीत |
असावणे | - | अश्रुयुक्त होणे. |
चंद्रिका | - | चांदणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.