भेटाल का कोणी माझ्या
भेटाल का कोणी माझ्या, माणसांना माहेरीच्या
लेक सुखी आहे सांगा, सावलींत सासरीच्या
माझ्या माहेराची वाट, नाहीं आडवळणाची
नाहीं कलहाचं ऊन, छाया मायेच्या वेलीची
तिथें नाहीं हेवा-दावा, नाहीं भांडणतंडण
सर्वांसाठीं आहे एक, एका मातीचं अंगण
दोघे भाऊ भावजय, माझे बाबा आणि आई
एका ताटांतला घांस, पांचामुखीं गोड होई
चार जोडलेले तुकडे, पांघरूण हो बाळाचें
मनें मनें जुळुनी झालें, महावस्त्र माहेराचें
दूर राहिलें माहेर, दिसेनाशी झाली वाट
आम्हां वेडया बायकांची सासराशीं जन्मगांठ
लेक सुखी आहे सांगा, सावलींत सासरीच्या
माझ्या माहेराची वाट, नाहीं आडवळणाची
नाहीं कलहाचं ऊन, छाया मायेच्या वेलीची
तिथें नाहीं हेवा-दावा, नाहीं भांडणतंडण
सर्वांसाठीं आहे एक, एका मातीचं अंगण
दोघे भाऊ भावजय, माझे बाबा आणि आई
एका ताटांतला घांस, पांचामुखीं गोड होई
चार जोडलेले तुकडे, पांघरूण हो बाळाचें
मनें मनें जुळुनी झालें, महावस्त्र माहेराचें
दूर राहिलें माहेर, दिसेनाशी झाली वाट
आम्हां वेडया बायकांची सासराशीं जन्मगांठ
गीत | - | बाळ कोल्हटकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | उषा अत्रे-वाघ |
नाटक | - | वेगळं व्हायचंय मला |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
वेगळं व्हायचंय मला-
या नाटकाची 'प्रस्तावना' ज्यांनी ज्यांनी मला या प्रयोगाच्या बाबतीत सहाय्य केलं (त्यांत श्री. बाबूराव गोखले आले, पेंटर फडके आले, आमचे प्रकाशक आले, त्याचबरोबर माझे सहकारी कलावंतहि आले.) त्या सर्वांचे आभार मानून त्या सर्वांपासून-
'वेगळं व्हायचं नाहीं मला'
अशी अपेक्षा करून संपवितों !
(संपादित)
या नाटकाची 'प्रस्तावना' ज्यांनी ज्यांनी मला या प्रयोगाच्या बाबतीत सहाय्य केलं (त्यांत श्री. बाबूराव गोखले आले, पेंटर फडके आले, आमचे प्रकाशक आले, त्याचबरोबर माझे सहकारी कलावंतहि आले.) त्या सर्वांचे आभार मानून त्या सर्वांपासून-
'वेगळं व्हायचं नाहीं मला'
अशी अपेक्षा करून संपवितों !
(संपादित)
बाळ कोल्हटकर
दि. २९ सप्टेंबर १९६०
'वेगळं व्हायचंय् मला' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- केशव वामन जोशी (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.