भारत अमुचा देश
भारत अमुचा देश, भारत अमुचा देव
'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक
भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक
आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी
प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी
दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ
धर्म-जातीच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू
उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रूढींना तोडू
विशाल भारत स्वप्नी त्याचा साकारू आलेख
प्रांत देश या पुढेही जाऊ, पूजू या मानवतेला
मित्र जगाचे सार्या होऊ, मित्र करूया त्याला
सत्य अहिंसा शांती यांचा संगम साधु सुरेख

गीत | - | विनायक रहातेकर |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | स्नेहल भाटकर, उषा टिमोथी |
चित्रपट | - | बहकलेला ब्रह्मचारी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.