भले बहाद्दुर भले
भले बहाद्दुर भले ! जवान हो,
अशीच टाका विजयपथावर पुढे पुढे पाऊले !
अभिमानाची मान आमुच्या
उन्नत झाली विजये तुमच्या
पराक्रमाने निज मातेचे भाळ तुम्ही उजळले !
शस्त्राहुनही समर्थ निष्ठा
शिकविलेत हे तुम्ही दुष्टा
प्रबळ शत्रुजन रणांत ठरला कळसूत्री बाहुले !
अगणित वैरी रणी संपले
रणगाड्यांचे जथे उलथले
अवकाशातच तुम्ही जाळिली त्यांची वायुदले !
अपरिहार्य तोवरी रणांगण
नव्हे आक्रमण, स्वदेश रक्षण
सार्वभौम्य स्वातंत्र्य आपुले हवेत रे राखिले !
अमुचे आत्मे-आशा-लोचन
तुम्हासंगे असती निशिदिन
सुयशी जाते तडीस जे जे सुजनी आरंभिले !
अशीच टाका विजयपथावर पुढे पुढे पाऊले !
अभिमानाची मान आमुच्या
उन्नत झाली विजये तुमच्या
पराक्रमाने निज मातेचे भाळ तुम्ही उजळले !
शस्त्राहुनही समर्थ निष्ठा
शिकविलेत हे तुम्ही दुष्टा
प्रबळ शत्रुजन रणांत ठरला कळसूत्री बाहुले !
अगणित वैरी रणी संपले
रणगाड्यांचे जथे उलथले
अवकाशातच तुम्ही जाळिली त्यांची वायुदले !
अपरिहार्य तोवरी रणांगण
नव्हे आक्रमण, स्वदेश रक्षण
सार्वभौम्य स्वातंत्र्य आपुले हवेत रे राखिले !
अमुचे आत्मे-आशा-लोचन
तुम्हासंगे असती निशिदिन
सुयशी जाते तडीस जे जे सुजनी आरंभिले !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | मधुकर गोळवलकर |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
जथा | - | समुदाय, टोळी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.