भाग्य उजळलें तुझे चरण
भाग्य उजळलें तुझे चरण पाहिले.
लागुनिया तुझे चरण
घर झाले हें पावन
इडापिडा जाति टळुन
हृदय विकसले.
करुणेचा तूं ठेवा
केली कशितरि सेवा
गोड करुनि परि देवा
सकळ घेतले.
आता परि करिसि गमन
पुनः पुनः दे दर्शन
हेंचि विनविं शिर नमवुन
हात जोडिले.
लागुनिया तुझे चरण
घर झाले हें पावन
इडापिडा जाति टळुन
हृदय विकसले.
करुणेचा तूं ठेवा
केली कशितरि सेवा
गोड करुनि परि देवा
सकळ घेतले.
आता परि करिसि गमन
पुनः पुनः दे दर्शन
हेंचि विनविं शिर नमवुन
हात जोडिले.
गीत | - | भा. रा. तांबे |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | माणिक वर्मा |
राग | - | भैरवी |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
इडापिडा | - | सर्व दु:ख, संकट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.