बेइमान झालो पुरा पुरा
बेइमान झालो पुरा पुरा, मी देशाचा अपराधी खरा !
भारतमातेचे हे प्यारे, स्वातंत्र्याचे उज्ज्वल तारे
बंदिवान मी केले सारे, मज क्षमा करा हो क्षमा करा !
मी परक्यांचा सेवक बनलो, आईला अन् भार जाहलो
मीठ खाऊनि हराम झालो, ही खंत जाळिते आज उरा !
हृदय जरी हे पाषाणाचे, नाहीं पण तें निर्दय साचे
भयाण रात्री एकान्तीचे, ते ढाळी आसवांच्या धारा !
हे देवांनो ! गगनामधुनि, लाख चांदण्यांच्या डोळ्यांनी
नका नका हो बघू रागानी, तो शाप जरा आवरुनी धरा !

गीत | - | श्रीनिवास खारकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.