अपुरे माझे स्वप्न राहिले
अपुरे माझे स्वप्न राहिले
का नयनांनो जागे केले?
ओळख तुमची सांगुन स्वारी
आली होती माझ्या दारी
कोण हवे हो? म्हणता त्यांना
दटावून मज घरात नेले
बोलत बसता वगळून मजला
गुपित चोरटे ऐकू कशाला?
जाण्याचा ते करुनी बहाणा
गुपचूप माझ्या मनात लपले
नीज सुखाची तुम्हा लागली
मंद पाउली स्वारी आली
गोड खळीने चहाडी केली
अधरांसी नच बोलु दिले
का नयनांनो जागे केले?
ओळख तुमची सांगुन स्वारी
आली होती माझ्या दारी
कोण हवे हो? म्हणता त्यांना
दटावून मज घरात नेले
बोलत बसता वगळून मजला
गुपित चोरटे ऐकू कशाला?
जाण्याचा ते करुनी बहाणा
गुपचूप माझ्या मनात लपले
नीज सुखाची तुम्हा लागली
मंद पाउली स्वारी आली
गोड खळीने चहाडी केली
अधरांसी नच बोलु दिले
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | भावगीत, कल्पनेचा कुंचला, नयनांच्या कोंदणी |
चहाडी | - | चुगली, लावालावी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.