अपर्णा तप करिते काननी
भस्मविलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करिते काननी !
वैभवभूषित वैकुंठेश्वर
तिच्या पित्याने योजियला वर
भोळा शंकर परि उमेच्या भरलासे लोचनी !
त्रिशूल डमरू पिनाकपाणी
चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि
युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी !
कोमल सुंदर हिमनगदुहिता
हिमाचलावर तप आचरिता
आगीमधुनी फूल कोवळे फुलवी रात्रंदिनी !
अपर्णा तप करिते काननी !
वैभवभूषित वैकुंठेश्वर
तिच्या पित्याने योजियला वर
भोळा शंकर परि उमेच्या भरलासे लोचनी !
त्रिशूल डमरू पिनाकपाणी
चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि
युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी !
कोमल सुंदर हिमनगदुहिता
हिमाचलावर तप आचरिता
आगीमधुनी फूल कोवळे फुलवी रात्रंदिनी !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | आनंदघन |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | तांबडी माती |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अपर्णा | - | पार्वतीचे त्यावेळचे नाव जेव्हा शंकर प्राप्तीसाठी तपश्चर्या करताना तिने झाडांची पाने खाणेही सोडले होते. |
कानन | - | अरण्य, जंगल. |
दुहिता | - | कन्या. |
पिनाकपाणी | - | शंकर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.