अंगणात खेळे राजा रंगरंगुनी
अंगणात खेळे राजा रंगरंगुनी
चांदण्यात अंग सारे माखमाखुनी
बघतसे जग बाई रोखरोखुनी
जगाचे त्या डोळे झाका जागजागुनी
नको खेळू राजा माझ्या अंगणात रे
दृष्ट लागे, भय वाटे, ये घरात रे
तुझा होई खेळ मला नाही थार रे
ये घरात राजा माझ्या, ये घरात रे
बांधी पैंजणांस पायी नाचे चांदणी
बाळ खेळू दे जगास घेई वेधुनी
हास हास रातराणी गोड हासुनी
बाळ खेळु दे, जगास टाकी भारुनी
चांदण्यात अंग सारे माखमाखुनी
बघतसे जग बाई रोखरोखुनी
जगाचे त्या डोळे झाका जागजागुनी
नको खेळू राजा माझ्या अंगणात रे
दृष्ट लागे, भय वाटे, ये घरात रे
तुझा होई खेळ मला नाही थार रे
ये घरात राजा माझ्या, ये घरात रे
बांधी पैंजणांस पायी नाचे चांदणी
बाळ खेळू दे जगास घेई वेधुनी
हास हास रातराणी गोड हासुनी
बाळ खेळु दे, जगास टाकी भारुनी
गीत | - | आशा गवाणकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | मालती पांडे |
गीत प्रकार | - | भावगीत |
थार | - | आधार, आश्रय. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.