आंधळ्याला पैसा दे दाता
धनमालाचा लोभ कशाला, काय उरे रे आपण जाता
आंधळ्याला पैसा दे दाता !
सोनेचांदी काय मिरविसी या दुनियेच्या हाती रे?
माझे माझे करीत चालसी, काळ लागला पाठी रे
दयेसारखा सद्गुण नाही, दाना ऐसा धर्म कोणता?
अरे माणसा अरे डोळसा, डोळे उघडून पाही रे
कोठून येसी कोठे जासी ठावूक तुजसी नाही रे
तुझ्या अंगीचे उपरे अवगुण लुबाडिती तुज येताजाता
पडेल वरची कुर्हाड अवचित कोसळेल ही काया रे
पोरेठोरे पिटतील छाती शोकही त्यांचा वाया रे
कुणी न तुजसी दाविल सलगी, शरीर कलेवर केवळ होता
संत तुकोबा बोलून गेला दस लाखाची वाणी रे
भलेपणाने मिळतील तितकी मिळव चालती नाणी रे
उदास ठेवी चित्त परंतु दुसर्यासाठी वित्त वेचता

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके |
चित्रपट | - | झेप |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कलेवर | - | शरीर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.