A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अनसूयेच्या धामी आले

अनसूयेच्या धामी आले त्रैलोक्याचे स्वामी
आले त्रैलोक्याचे स्वामी

गुलाल उधळा, उधळा सुमने
जयजयकारे घुमवा भुवने
पूर्णब्रह्म हे आले भूवर धर्मक्षरण्याकामी

फुलाफुलांनो सुगंध उधळा
विमलजलांनो सहर्ष उसळा
पवनलहरींनो मंगलवार्ता कळवा ग्रामोग्रामी

हाच सद्गुरू त्रैलोक्याचा
उद्धारक हा चराचराचा
हा योग्यांचा श्रीयोगेश्वर प्रभु हा त्रिभुवनगामी