अंबरांत नाजुकशी चंद्रकोर
अंबरांत नाजुकशी चंद्रकोर हांसे
मंदिरांत कां ग सखे सोडिसी उसासे
कुस्करुनी टकिलीस माळ ही कळ्यांची
चालविली उघडझांप नेत्रपाकळ्यांची
मोकळाच केशपाश, वसन तुझें साधें
कां धरिसी हरिवरती मधुरुसवा राधे?
कंसदमन करण्या हरि मथुरेला गेला
येइल परतूनि खचित घेउनि जयमाला
रथ दारीं राहि उभा, कोण गे तयांत
आण गडे पंचारति, आले यदुनाथ
प्रणयसागरावरती रमणिहृदय नाचें
अंबरांत नाजुकशी चंद्रकोर हांसे.
मंदिरांत कां ग सखे सोडिसी उसासे
कुस्करुनी टकिलीस माळ ही कळ्यांची
चालविली उघडझांप नेत्रपाकळ्यांची
मोकळाच केशपाश, वसन तुझें साधें
कां धरिसी हरिवरती मधुरुसवा राधे?
कंसदमन करण्या हरि मथुरेला गेला
येइल परतूनि खचित घेउनि जयमाला
रथ दारीं राहि उभा, कोण गे तयांत
आण गडे पंचारति, आले यदुनाथ
प्रणयसागरावरती रमणिहृदय नाचें
अंबरांत नाजुकशी चंद्रकोर हांसे.
गीत | - | संजीवनी मराठे |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | मधुबाला जव्हेरी |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत, हे श्यामसुंदर |
दमन | - | खोड मोडणे, जिरवणे. |
रमणी | - | सुंदर स्त्री / पत्नी. |
वसन | - | वस्त्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.