अजून उजाडत नाही ग (२)
अजून उजाडत नाही ग !
शून्य उभे या उगमापाशी, शून्यच केवळ अंती ग
अज्ञाताच्या प्रदेशातली संपेना भटकंती ग
अज्ञानाच्या सौख्याचाही इथे दिलासा नाही ग
अंतरातल्या विश्वासाची आता नुरली ग्वाही ग
अजून उजाडत नाही ग !
गूढ सावल्या काही हलती देहाला ओलांडून ग
सरकत येते अंधाराची लाट अंगणी दाटून ग
जिथवर पणती तिथवर गणती, थांग तमाचा नाही ग
आडून आडून साद घालते अदृष्यातील काही ग

गीत | - | संदीप खरे |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वर | - | सलील कुलकर्णी |
चित्रपट | - | चकवा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अदृष्ट(ष्य) | - | न पाहिलेले / दैव, प्रारब्ध. |
ग्वाही | - | खात्री. |
नुरणे | - | न उरणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.