अजन्मा जन्मासी आला
अजन्मा जन्मासी आला
कारागारी अंधकारी कृष्णजन्म झाला
देवदुर्लभा सती देवकी
तिच्या तनूची करून पालखी
अनंत आले मानवलोकी
प्रसव-व्यथेवीण उरी होता तो, उदरी अवतरला
'सोहं सोहं' नाद उमटता
वळुनी कवळी देवकीमाता
फुटला पान्हा, बघता तान्हा
तुटे शृंखला बंधनातुनी, मोक्ष करी आला
बाहेरून तो गर्जे वारा
नाचू लागल्या श्रावणधारा
भिजली दारे, भिजल्या कारा
झडली कुलुपे कड्या उघडल्या, बंदिवास सरला
कारागारी अंधकारी कृष्णजन्म झाला
देवदुर्लभा सती देवकी
तिच्या तनूची करून पालखी
अनंत आले मानवलोकी
प्रसव-व्यथेवीण उरी होता तो, उदरी अवतरला
'सोहं सोहं' नाद उमटता
वळुनी कवळी देवकीमाता
फुटला पान्हा, बघता तान्हा
तुटे शृंखला बंधनातुनी, मोक्ष करी आला
बाहेरून तो गर्जे वारा
नाचू लागल्या श्रावणधारा
भिजली दारे, भिजल्या कारा
झडली कुलुपे कड्या उघडल्या, बंदिवास सरला
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सी. रामचंद्र |
स्वर | - | फैयाज |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर |
टीप - • ग. दि. माडगूळकर रचित 'गीतगोपाल' मधून. |
कारा | - | कारावास. |
सोहं | - | मीच ब्रह्म असा भाव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.