A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऐरणीच्या देवा तुला

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे !

लेऊ लेणं गरिबीचं
चणं खाऊ लोखंडाचं
जिणं व्हावं आबरूचं
धनी मातुर माझा देवा, वाघावाणी असू दे !

लक्ष्मीच्या हातातली
चवरी व्हावी वरखाली
इडापीडा जाईल, आली-
किरपा तुझी, भात्यातल्या सुरासंगं गाऊ दे !

सुख थोडं, दु:ख भारी
दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी-
सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे !