अभंग माझा एकतारीवर
अभंग माझा एकतारीवर, गाई रूपडे तुझेच सुंदर
तुझी पाऊले सान गोजिरी, कुमकुम रंगांकित झालेली
उघड्या अंगा उटी केशरी, श्रीपद लांछन तव वक्षावर
वैजयंतीची काळी माळा, तुला शोभते रे गोपाळा
स्वैर बांधिसी कटिला शेला, हास्य सदाचे तुझ्या मुखावर
शंख-चक्र अन् गदा घेउनी सदा उभा तू भक्त रक्षणी
पद्मविभूषण कमल हुंगुनी, कमलफुलाहुन अससी कोमल

गीत | - | भालचंद्र खांडेकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भक्तीगीत |
कटि | - | कंबर. |
लांछन | - | डाग / कलंक. |
वैजयंती | - | विष्णूच्या गळ्यातली काळी माळ. |
सान | - | लहान. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.