A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज मी निराधार एकला

माय माउली कुठे साउली
कुठे निवारा मला, आज मी निराधार एकला !

त्या हाताची ऊब निराळी
अंगाईच्या मंजुळ ओळी
चिऊकाऊची अंगतपंगत अंतरलो मी तिला !

असशील कोठे आई, आई
पोरक्यास या पदरी घेई
कशी विसरली माय मुलाला, कसा तोडला लळा?

जगी जयाला कोणी नाही
तूच तयाची होसी आई
या बाळाची कशी येईना करुणा देवा तुला?