आठवते ती रात अजुनी
आठवते ती रात अजुनी
आठवते ती रात
त्या रात्रीला पंख लाभले
स्वप्नांचे हळुवार चिमुकले
इंद्रधनुचे रंग मिसळले अनोळखी चित्रात
त्या रात्री हा चंद्रही नव्हता
नव्हते तारे, निर्झर नव्हता
ओळख नव्हती, धीरही नव्हता, लाज उभी नयनांत
त्या रात्री ती किमया झाली
आली उमलून मूक अबोली
धीट पापणी वळली खाली, क्षणभर जुळता हात
आठवते ती रात
त्या रात्रीला पंख लाभले
स्वप्नांचे हळुवार चिमुकले
इंद्रधनुचे रंग मिसळले अनोळखी चित्रात
त्या रात्री हा चंद्रही नव्हता
नव्हते तारे, निर्झर नव्हता
ओळख नव्हती, धीरही नव्हता, लाज उभी नयनांत
त्या रात्री ती किमया झाली
आली उमलून मूक अबोली
धीट पापणी वळली खाली, क्षणभर जुळता हात
गीत | - | |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | कलंक शोभा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.