A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आताच अमृताची बरसून

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली?