या यमुनेच्या काठावरती
या यमुनेच्या काठावरती
असा कसा तू उभा राजसा, हात ठेउनी कमरेवरती
या लाटांचा बघता चाळा
वार्याला ये अर्थ वेगळा
लहरींमधुनी बघतो फुलती तव रूपाची मोहक कांती
या यमुनेच्या काठावरती
पळवितोस का वस्त्रे तरुवर
गोपीहुन का वस्त्रे सुंदर?
बघण्यासाठी हवेच अंतर, असेच बघता जमली नाती
या यमुनेच्या काठावरती
असा कसा तू उभा राजसा, हात ठेउनी कमरेवरती
या लाटांचा बघता चाळा
वार्याला ये अर्थ वेगळा
लहरींमधुनी बघतो फुलती तव रूपाची मोहक कांती
या यमुनेच्या काठावरती
पळवितोस का वस्त्रे तरुवर
गोपीहुन का वस्त्रे सुंदर?
बघण्यासाठी हवेच अंतर, असेच बघता जमली नाती
या यमुनेच्या काठावरती
गीत | - | शंकर वैद्य |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा खाडिलकर, शरद जांभेकर |
चित्रपट | - | चिमणराव गुंड्याभाऊ |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.