आनंदघन क्षणांचा रावा
आनंदघन क्षणांचा रावा दुरून यावा
निष्प्राण या जिण्याचा आषाढमेघ व्हावा
मी मागताच दान उलटे सदैव फासे
माध्यान्ह वेदनेला सुखचंद्र खिन्न हासे
निष्पर्ण शुष्क शाख मधुकूजनी भिजावा
स्वप्नांस का फुलांच्या नित् जाग बोचणारी
डोळ्यांतली स्मिते अन् अंति आसावणारी
या विद्ध मैफलीचा बेनूर शेवटावा
निष्प्राण या जिण्याचा आषाढमेघ व्हावा
मी मागताच दान उलटे सदैव फासे
माध्यान्ह वेदनेला सुखचंद्र खिन्न हासे
निष्पर्ण शुष्क शाख मधुकूजनी भिजावा
स्वप्नांस का फुलांच्या नित् जाग बोचणारी
डोळ्यांतली स्मिते अन् अंति आसावणारी
या विद्ध मैफलीचा बेनूर शेवटावा
गीत | - | अरुण काकतकर |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | श्रीकांत पारगांवकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
रावा | - | पोपट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.