आज या एकान्त काली
आज या एकान्त काली मीलनाची पर्वणी
दूर का तू साजणी, दूर का तू साजणी?
सोड खोटा राग रुसवा, हा बहाणा काय फसवा
लाजरी मूर्ती तुझी ही अधिक वाटे देखणी
देखणी हे साजणी
दो जिवांच्या संगतीने फुलून येती फूल-पाने
दिवस होई रात्र येथे, रात्र वाटे चांदणी
चांदणी हे साजणी
हे गुलाबी धुंद कोडे, बोल थोडे, हास थोडे
स्वप्नवेड्या प्रियकराची ऐक वेडी मागणी
मागणी हे साजणी
दूर का तू साजणी, दूर का तू साजणी?
सोड खोटा राग रुसवा, हा बहाणा काय फसवा
लाजरी मूर्ती तुझी ही अधिक वाटे देखणी
देखणी हे साजणी
दो जिवांच्या संगतीने फुलून येती फूल-पाने
दिवस होई रात्र येथे, रात्र वाटे चांदणी
चांदणी हे साजणी
हे गुलाबी धुंद कोडे, बोल थोडे, हास थोडे
स्वप्नवेड्या प्रियकराची ऐक वेडी मागणी
मागणी हे साजणी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | चंद्रशेखर गाडगीळ |
चित्रपट | - | नाते जडले दोन जिवांचे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.