आईस हाक मारी
ती हाक येइ कानी
मज होय शोककारी
नोहेच हाक, माते
मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी?
आई घरी न दारी
चारा मुखी पिलांच्या
चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना
ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी
व्याकूळ जीव होई
येशील तू घराला
परतून केधवा गे?
रुसणार मी न आता
जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी
आई घरी न दारी
स्वामी तिन्ही जगांचा
आईविना भिकारी
गीत | - | कवी यशवन्त |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वराविष्कार | - | ∙ आशा भोसले ∙ जी. एन्. जोशी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | श्यामची आई |
गीत प्रकार | - | आई, चित्रगीत, कविता |
टीप - • काव्य रचना- २२ जानेवारी १९२२ • पोरक्या मुलाचा मातृशोक. • स्वर- आशा भोसले, संगीत- वसंत देसाई, चित्रपट- श्यामची आई. • स्वर- जी. एन्. जोशी, संगीत- जी. एन्. जोशी. |
कुठार | - | कुर्हाड. |
केधवा | - | केव्हा. |
'आई' म्हणोनि कोणीआईस हाक मारी
ती हाक येइ कानींमज होय शोककारी
नोहेच हाक, मातेंमारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणूं मी?आई घरीं न दारीं !
ही न्यूनता सुखाचीचित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगांचाआईविना भिकारी.
चारा मुखीं पिलांच्याचिमणी हळूच देई
गोठ्यांत वासरांनाह्या चाटतात गाई
वात्सल्य हें पशूंचेंमी रोज रोज पाहीं
पाहून अन्तरात्माव्याकूळ मात्र होई
वात्सल्य माउलीचेंआम्हां जगांत नाहीं
दुर्भाग्य याविना काआम्हांस नाहिं आई.
शाळेंतुनी घरालायेतां धरील पोटीं
काढून ठेविलेलाघालील घास ओठीं
उष्ट्या तशा मुखाच्याधावेल चुम्बना ती
कोणी तुझ्याविना गेका ह्या करील गोष्टी?
तूझ्याविना न कोणीलावील साञ्जवाती
सांङ्गेलना ना म्हणायाआम्हां 'शुभम् करोति'
ताईस या कशाचीजाणीव कांहिं नाहीं
त्या सान बालिकेलासमजे न यांत कांहीं
पाणी तरारतांनानेत्रांत, बावरे ही
ऐकूनि धे परन्तु"आम्हांस नाहिं आई"
साङ्गे तसें मुलींना"आम्हांस नाहिं आई"
ते बोल येति कानीं"आम्हांस नाहिं आई"
आई ! तुझ्याच ठायींसामर्थ्य नन्दिनीचें
माहेर मङ्गलाचेंअद्वैत तापसांचें
गाम्भीर्य सागराचेंऔदार्य या धरेचें
नेत्रांत तेज नाचेत्या शान्त चन्द्रिकेचें
वात्सल्य गाढ त्या मेघमण्डळाचें
वास्तव्य या गुणांचेंआई, तुझ्यांत सचि
गुम्फून पूर्वजांच्यामीं गाइलें गुणांला
सार्या सभाजनांनींया वानिलें कृतीला
आई, करावया तूंनाहींस कौतुकाला
या न्यूनतेमुळे हीमज त्याज्य पुष्पमाला
पञ्चारती जनांचीना तोषवी मनाला
परि जीव बालकाचातव कौतुका भुकेला
येशील तूं घरालापरतून केधवां गे
|दवडूं नको घडीलाये ये निघून वेगें
हे गुन्तले जिवींचेपायीं तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचेंकरण्यास येइं वेगें
रुसणार मी न आताजरि बोलशील रागें
ये रागवावयाहीपरि येइं ये वेगें
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.