ए आई मला पावसात
ए आई मला पावसात जाऊ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचू दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करू दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप-खोकला-शिंका सर्दी, वाट्टेल् ते होऊ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचू दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करू दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप-खोकला-शिंका सर्दी, वाट्टेल् ते होऊ दे
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | योगेश खडीकर |
गीत प्रकार | - | बालगीत, ऋतू बरवा |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.