A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
येथोनि आनंदु रे

येथोनि आनंदु रे ।
कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥

महाराजाचे राउळीं ।
वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥

लक्ष्मी चतुर्भुज जाली ।
प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥

एका जनार्दनीं नाम ।
पाहतां मिळे आत्माराम ॥४॥