A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
यत्‍न तो देव जाण राणी

उदंड आली उदासीनता, जळ दाटे नयनी
यत्‍न तो देव जाण राणी !

शिवरायाच्या आठव रूपा
आठव त्याच्या पुण्यप्रतापा
विझता वन्‍ही चेतव फिरुनी, आनंदवनभुवनी !

पुन्हा मराठा तितुका मेळव
तुझ्या पाठीशी रघुपति राघव
वानरसेना जाईल तरुनी सिंधूचे पाणी !

लंकापतीसम म्लेंच्छा बुडवी
निशाण भगवे गगनी चढवी
धर्मरक्षिता नाही तुजविण भूमंडळी कोणी !