A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
यशाने दुमदुमवू त्रिभुवने

यशाने, दुमदुमवू त्रिभुवने

सकल भेद भारती मिटावे
अभिमाने हे राष्ट्र उठावे
आकांक्षांनी अशा आमुची संचरलेली मने

कर्तुत्वाच्या विश्वासावर
सदैव आम्ही राहू निर्भर
नैराश्याचे ऐकु न येईल यापुढती तुणतुणे

मन का दुबळे अदास व्हाया?
लोह असे का मन गंजाया?
का भीषण त्या मुशीत सोने ठरते हिणकस उणे?

वाळूवरती मीन तडफडे
तसेच अमुचे जीवन उघडे
ध्येयसागरी विहरू अथवा क्षणी संपवू जिणे !

संकल्पाच्या सिद्धीवाचुन
थांबू आम्ही एकही न क्षण
नेत्याच्या त्या आधीन केवळ अमुची ही जीवने

कर्तृत्वाचा उंच हिमाचल
भीषणतेतहि निर्भय निश्चल
नेता ऐसा मिळे अम्हाला, काय असे मग उणे?
गीत - नाना पालकर
संगीत -
स्वर-
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• काव्य रचना- १९४५
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
मीन - मासा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.