A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या प्रणयी ललना

या प्रणयी ललना मना । ये परकामना ।
आभास दे भयभावना ॥

मानमया हृदया अबलेच्या । कटुता ये हताश दीन ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- भार्गवराम आचरेकर
नाटक - स्वयं-सेवक
राग - सूरमल्हार
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
भूमिका

माझ्या 'सोन्याचा कळस' या नाटकाच्या कथानकाप्रमाणेंच हें कथानकही असेंच सात आठ वर्षे तिष्ठत राहिलें होतें. याचा प्रयोग होण्याचा योगही गेल्या वर्षी आला होता. त्याप्रमाणें यांतील गायनांचे रेकॉर्डही सहा महिन्यापूर्वीच बाजारांत विक्रीसाठीं आले होते; पण नाटक मात्र रंगभूमीवर आतां येत आहे.

गुलामांचा व्यापार हिंदुस्थानांत ज्या स्वरूपांत अजूनही प्रत्येक गांवांगांवांतून चालतो आहे, त्याचें हें अस्पटसें चित्र आहे. या विषयावर 'चिमणी' नांवाची माली पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली होती.

त्या कादंबरीत 'मुलाला गहाण घेणारा' सावकार सज्जन होता. दुर्जन असल्यावर काय स्वरूप येतें तें या 'स्वयं-सेवकांत'. स्वतःच्या इच्छेने बळेंच नोकर होऊन राहणार्‍या जगन्‍नाथाच्या चरित्रांत दाखविले आहे.

या विषयाच्या प्रकरणी आमच्या कायदेकौन्सिलांतील प्रतिनिधींचे डोळे उघडणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. पण असा एक विषय आहे, एवढी सामान्य जनतेला या नाटकामुळें माहिती झाली तरी या नाटकानें मोठेच कार्य केलें, असें मला वाटेल.
(संपादित)

भार्गवराम विठ्ठल वरेरकर
दि. २ ऑगस्ट १९३४
'स्वयं-सेवक' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- दत्ताराम रामकृष्ण देऊलकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.