या पाण्याची ओढ भयानक
या पाण्याची ओढ भयानक
नेई अचानक डोहाखाली
चुकू लागले नाडी-ठोके, अंगांगावर गुंगी आली
तुला मला ते कळले पुरते
डोहाजवळी आल्यानंतर
दो हातांवर दोघे असुनी अलंघ्य झाले तेही अंतर
उभय तीर तर हुकले आता
वाट उरे आवर्तामधली
कशास आता दुबळा झगडा अर्धीमुर्धी घटका उरली
पृथ्वीवरचे पुण्य हरपले
स्वर्गाकडची चुकलो परवल
का नाही गे, का नाही मग भोगायाचे अतल रसातल
नेई अचानक डोहाखाली
चुकू लागले नाडी-ठोके, अंगांगावर गुंगी आली
तुला मला ते कळले पुरते
डोहाजवळी आल्यानंतर
दो हातांवर दोघे असुनी अलंघ्य झाले तेही अंतर
उभय तीर तर हुकले आता
वाट उरे आवर्तामधली
कशास आता दुबळा झगडा अर्धीमुर्धी घटका उरली
पृथ्वीवरचे पुण्य हरपले
स्वर्गाकडची चुकलो परवल
का नाही गे, का नाही मग भोगायाचे अतल रसातल
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | वसंत आजगांवकर |
स्वर | - | वसंत आजगांवकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
अतल | - | विवर / नरक / सप्तपातालांपैकी एक. सप्त पातालांची नावे- अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल व पाताल. |
परवल | - | खूण, संकेत, परवलीचा शब्द. |
रसातल | - | सप्तपातालांपैकी एक. सप्त पातालांची नावे- अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल व पाताल. |
लंघणे (उल्लंघणे) | - | ओलांडणे, पार करणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.