A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या पंढरीचें सुख

या पंढरीचें सुख पाहतां डोळां ।
उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥

ह्मणोनियां मन वेधलें चरणीं ।
आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥

जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं ।
करी वोवाळणी शरीराची ॥३॥