या नव्या सुखाला काय
या नव्या सुखाला काय म्हणू?
हे भाग्य नव्हे सौभाग्य जणू !
नटली शोभा नव्या घराची
ठेव सासरी माहेराची
अखंड माया संसाराची गोफ लागली विणू
फांदीवरती चिमणाचिमणी
खुणाविती मजला रे घरट्यामधुनी
एकान्तीचे सुख पाहुनी थरथरली ही तनू
या राजाची मी तर राणी
जीव फुलविते मोरावाणी
आनंदाची आळवित गाणी किती मी शिणू
हे भाग्य नव्हे सौभाग्य जणू !
नटली शोभा नव्या घराची
ठेव सासरी माहेराची
अखंड माया संसाराची गोफ लागली विणू
फांदीवरती चिमणाचिमणी
खुणाविती मजला रे घरट्यामधुनी
एकान्तीचे सुख पाहुनी थरथरली ही तनू
या राजाची मी तर राणी
जीव फुलविते मोरावाणी
आनंदाची आळवित गाणी किती मी शिणू
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | काळी बायको |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.