A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या कातरवेळी (२)

या कातरवेळी,
पाहिजेस तू जवळी

एकटी मी दे आधार
छेड हळू हृदय-तार
ऐक आर्त ही पुकार
सांजवात ये उजळी

रजनीची चाहूल ये
उचलुनिया अलगद घे
पैलतिरी मजला ने
पुसट वाट पायदळी

शिणले रे, मी अधीर
भवती पसरे तिमिर
व्याकुळ नयनांत नीर
मीलनाची आस खुळी