या गो दांड्यावरना बोलते
या गो दांड्यावरना बोलते नवरा कुणाचा येतो
त्याच्या करवल्या गो करवल्या नाजुक-साजुक
त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी सार्या
त्यांच्या डोईमंदी सायलींच्या गो येन्या
पायी पैंजण गो वाजती रुणझुण छुनछुन
त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत
त्यांचे वर्हाडी गो वर्हाडी फेटेवाले
त्यांचे यजमान गो यजमान चष्मेवाले
त्यांचे भाऊबंद गो भाऊबंद घोडेवाले
त्यांनी उडविले, उडविले दारुगोले
त्याच्या करवल्या गो करवल्या नाजुक-साजुक
त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी सार्या
त्यांच्या डोईमंदी सायलींच्या गो येन्या
पायी पैंजण गो वाजती रुणझुण छुनछुन
त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत
त्यांचे वर्हाडी गो वर्हाडी फेटेवाले
त्यांचे यजमान गो यजमान चष्मेवाले
त्यांचे भाऊबंद गो भाऊबंद घोडेवाले
त्यांनी उडविले, उडविले दारुगोले
गीत | - | पारंपरिक |
संगीत | - | शाहीर साबळे |
स्वर | - | शाहीर साबळे |
गीत प्रकार | - | कोळीगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.