विषवल्ली असुनी भवती
विषवल्ली असुनी भवती
सखये, तू अमृतवेल
ग्रीष्माचा दाहक फेरा, तू त्यात मृगाची धारा
कोलाहल भवती सारा, तू मंजूळ तान सुरेल
सखये, तू अमृतवेल
जे जन्मांतरी वांच्छियले, जे जन्मभरी शोधियले
तुज समीप येता सगळे ते श्रेय क्षणांत मिळेल
सखया, ही अमृत वेळ
विषवल्ली असुनी भवती,
फुलुनी ये अमृतवेल
सखये, तू अमृतवेल
ग्रीष्माचा दाहक फेरा, तू त्यात मृगाची धारा
कोलाहल भवती सारा, तू मंजूळ तान सुरेल
सखये, तू अमृतवेल
जे जन्मांतरी वांच्छियले, जे जन्मभरी शोधियले
तुज समीप येता सगळे ते श्रेय क्षणांत मिळेल
सखया, ही अमृत वेळ
विषवल्ली असुनी भवती,
फुलुनी ये अमृतवेल
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | भास्कर चंदावरकर |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, श्रीकांत पारगांवकर |
चित्रपट | - | एक डाव भुताचा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
वांच्छा | - | इच्छा. |
श्रेय | - | पुण्य / कल्याण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.