A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वेगळ्या जगात या

वेगळ्या जगात या अशी कशी दंगले
धुंद या स्वरांत मी आज रंगरंगले

वेगळ्या जगात या सूर आज रंगले
धुंद या स्वरांत मन आज दंगदंगले

भरारून झेप घेई पाखरू मनाचे
दाही दिशा मोकळ्या, या बंध ना कुणाचे
स्वप्‍न आज प्रीतीचे लोचनांत जागले
धुंद या स्वरांत मी आज रंगरंगले

झाड-वेल-फूल-पाने कुजबुजू बोलती
तुझेमाझे गुपित हे कानामधी खोलती
एकान्‍ती संगतीचे वेड जणू लागले
धुंद या स्वरात मन आज दंगदंगले

झोका घेई फांदीवर प्रीत माझी साजणा
मिठीमधे रेशमाच्या येशील का सांग ना?
स्पर्श हा नवा नवा, रोम रोम झिंगले
धुंद या स्वरांत मी आज रंगरंगले
धुंद या स्वरांत मन आज दंगदंगले